Pub-G एक व्यसन .
आज सुट्टीचा दिवस त्यामुळे आज जरा निवांतच उठलो. मला कामानिमित्त स्वारगेटला जायचं असल्यामुळे मी राहत असलेल्या ठिकाणपासुन जवळच असलेल्या PMT बसस्थानकाकडे मार्गस्थ झालो.उन्हाचा तडाखा जरा जास्तच जाणवत होता. त्यामुळे सावलीत उभे राहण्यासाठी मी स्थानकात गेलो. त्या ठिकाणी मला वेगळंच चित्र पहायला मिळाल .दुपारच्या वेळेला त्या बसस्थानकामध्ये बसण्यासाठी थोडी सुद्धा जागा नव्हती. लहान मुला पासुन ते लग्नाला आलेल्या पोरापर्यंत सर्वजण मोबाईल हातात घेऊन बसले होते. प्रथम दर्शनी मला वाटलं हे कोणत्या तरी बसची वाट पाहत असावेत. पण नंतर माझ्या लक्ष्यात आलं की हे कोणतीतरी game खेळत आहेत. त्या टोळक्यामधे मी थोडीशी बसण्यापूरती जागा मिळवली. थोडीशी सावली मिळाल्यामुळे जरा बरं वाटलं. मी शेजारीच बसलेल्या एका लहान मुलाला विचारलं तू काय खेळतो आहेस त्यावर तो म्हणाला 'Pub - G' मला या गेमविषयी ऐकून माहीत होत. पण प्रत्यक्षात कधी ती गेम पाहिली नव्हती. ती मुलं Pub - G खेळण्यामध्ये इतके गुंग झालेले दिसत होते की समोर कोण आलं ? समोरून कोणती गाडी...