Posts

करड (एक ग्रामीण कथा )

@ एक सत्य घटनेवर आधारित ग्रामीण कथा @                              माय न तोंडावर गरम पाण्याचे शिंतोड मारल तसा गण्या  चटकन जागा झाला  दिवस कधीचा उगवला होता. माय न रोजच टिम टिम गाण चालू केल " गण्या उठ लवकर, मगापासन  शेरड ओरडाय लागल्याती आणि तू डाराडूर झोपी गेलाय उठ लवकर." आईच्या आवाजान गण्या चटकन उठून बसला. गण्यान सगळ आटोपून तोंड धूतल व न्याहारीसाठी आतल्या सोप्यात जावून बसला. माय न ताटात शिळी भाकरी अन खरडा वाढला तोच शेणकुटाच्या धुरान  गण्याच्या डोळ्यात पाणी आल तसं गण्या ताट घेऊन तराट बाहेर आला अनं कटट्यावर बसला. त्याची नजर दोनच दिवसा पूर्वी  उपजलेल्या करडावरती पडली. एक काळ्या  रंगाचं व दुसरं पांढऱ्या  रंगाचं दिसायला खुप छान दिसायची अस वाटायच त्यांना कवेत घेतल की परत सोडूच नये. गण्याची न्याहरी आटोपली व तो शेरडांची दुरी सोडू लागला. त्याने शेरडांना सोडलं तसं ही बारकी करडं आईच्या पाठोपाठ अडव्या - तिडव्या उड्या मारत जावू लागली. त्या दोन करडांना बघितलं की गण्या जाम खुष व्हायचा. नुकताच...

जन्मदाते

Image
                           जन्मदाते            गुजरातमधील वडोदरा मधे वास्तव्यास असतानाची गोष्ट. नुकताच कामावरून घरी परतलो होतो. आणि कंटाळा आल्यामुळे जमीनीवर अंग सोडल होत. तेवढ्यात आम्हाला गल्लीत राहणाऱ्या काकीनी हाक दिली की रूम मोकळी झाली आहे तुम्हाला पहायची असेल तर पाहून घ्या. तस मी व माझा मित्र ती रूम पाहण्यासाठी बाहेर पडलो. आमच्या कंपनीमध्ये महाराष्ट्रातून नवीन मुल दाखल झाली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्हाला रूम बघायची होती. तशा त्या काकी मराठी होत्या त्यामुळे आमच काम आणखीन सोप झाल. कारण परराज्यातून आलेल्या तरुणांसाठी गुजरात मधे रूम शोधन किती अवघड असत याचा मला प्रत्यय आला होता. रूम विषयी मनामध्ये अंदाज बांधत आम्ही रूमकडे  मार्गस्थ झालो.           काकींनी रूम च कुलूप काढल व आम्ही रूममध्ये प्रवेश केला. तशी रूम ठिकठाक होती . आम्हाला पसंद पडली व आम्ही मित्रांना विचारून कळवतो अस सांगितल . याच्यानंतर आम्ही काकी राहत असलेल्या त्यांच्या घरात गेलो. मी काकीच्य...

वादळ कोरोनाचे.

              कोरोनाचे वादळ खुप आहे विचित्र            धर्म, जातीच्या भिंती तोडून सर्व आले एकत्र.        शहारातूनी माणसांचे लोंढे गावाकडे निघाले.       खूप दिवसांनी घरामध्ये उत्सवाचे वातावरण आले.       वडीलधाऱ्या माणसांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रु दाटले.        कारण खूप दिवसांनी घराला घरपण आले.         इटली, अमेरिका, चीन झाले तुझ्यापुढे हतबल.        कोरोना नाही पाहत मानासाकडील नोटांची बंडल.        माणसातील माणुसकी धर्म ज्यावेळी जागल.        त्याक्षणी कोरोनाच वादळ हळुहळु संपल.         मनुष्याने स्वार्थापायी केले पर्यावरणावर आक्रमण.         काय, कसं खाव याच्यावर राहील नाही नियंत्रण.         म्हणून कोरोणाच वाढत आहे मनुष्य-प्राण्यांमध्ये संक्रमण          माणसाला जमिनीवर आणण्यासाठ...

Bargaining

        काही दिवसांपुर्वीची गोष्ट रविवार असल्यामुळे थोडा उशीराचं उठलो. तशी पुण्यामध्ये बरीच लोक ही रविवारी उशीराच उठतात. पेपर आणण्यासाठी मी अकराच्या दरम्यान घराबाहेर पडलो.सकाळी 11 वाजता देखील उन्हाच्या झळा खूप मोठ्या प्रमाणावर जाणवत होत्या.रस्त्याच्याकडेला एक बाई बहूधा शेतकरी कुटूंबातीलचं असावी. भाजीपाला विकत बसली होती. रंगाने सावळी असलेली ती बाई आपल्या चिमुकल्या अशा लहान मुलीला सोबत घेऊन भर उन्हामधे डोक्यावरती टॉवेल घेऊन आणलेला भाजीपाला कधी खपतोय याची वाट पाहत असावी .ती लहानशी मुलगी आपल्या आईला काहीतरी खुणावत होती बहुधा ती आपल्याला भूक लागली आहे अशी सांगत असावी ती बाई  मात्र तिच्या खुणेकडे कानाडोळा करत होती बहुधा तिला आपला माल विकून चार पैसे खिशात घेऊन घरी जाण्याची घाई झालेली असावी .मी तिथेच  एक वर्तमानपत्र घेतल व उसाचा रस पिताना केलेल हे निरीक्षण तेवड्यात एक करड्या कलरची अशी मर्सिडीज गाडी आली व त्या बाईपाशी थांबली.त्या गाडीमधून  जीन्स व टी- शर्ट  परिधान केलेली बाई गाडीतून उतरली .तिच्या  एकंदरीत  वेशभूषेवरून  ती खूप मोठया घरातील...

Pub-G एक व्यसन .

          आज सुट्टीचा  दिवस त्यामुळे आज जरा निवांतच उठलो. मला कामानिमित्त स्वारगेटला जायचं असल्यामुळे मी राहत असलेल्या ठिकाणपासुन जवळच असलेल्या PMT बसस्थानकाकडे मार्गस्थ  झालो.उन्हाचा तडाखा जरा जास्तच जाणवत होता. त्यामुळे सावलीत उभे राहण्यासाठी मी स्थानकात गेलो. त्या ठिकाणी मला वेगळंच चित्र पहायला मिळाल .दुपारच्या वेळेला त्या बसस्थानकामध्ये बसण्यासाठी थोडी सुद्धा जागा नव्हती. लहान मुला पासुन ते लग्नाला आलेल्या पोरापर्यंत  सर्वजण  मोबाईल हातात घेऊन बसले होते. प्रथम दर्शनी  मला वाटलं हे कोणत्या तरी बसची वाट पाहत असावेत. पण नंतर माझ्या लक्ष्यात आलं की हे कोणतीतरी game खेळत आहेत. त्या टोळक्यामधे  मी थोडीशी बसण्यापूरती जागा मिळवली. थोडीशी सावली मिळाल्यामुळे जरा बरं वाटलं. मी शेजारीच बसलेल्या एका लहान मुलाला विचारलं तू काय खेळतो आहेस त्यावर तो म्हणाला  'Pub - G' मला या गेमविषयी ऐकून माहीत होत. पण प्रत्यक्षात कधी ती गेम पाहिली नव्हती. ती मुलं Pub - G खेळण्यामध्ये इतके गुंग झालेले दिसत होते की समोर कोण आलं ?  समोरून कोणती गाडी...

इंग्लिश मीडियम एक Fashion .

            2 महिन्यापुर्वीची गोष्ट  पुण्यामधे  रेल्वे स्टेशनवरून हडपसर कडे जाण्यासाठी निघालो तिथे एका लहान मुलाने व त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्ति ने माझे लक्ष वेधून घेतले. मुलाने आकर्षक असा शाळेचा गणवेष परिधान केला होता , पायामधे काळ्या रंगाचे सुंदर असे बूट होते दिसायला तो 4-5वर्षाचा चिमुकला छान वाटत होता पण त्याच्या सोबत असणारी व्यक्ती मात्र विचित्र  वाटत होती. फाटका  व मळकटलेला शर्ट  व मळकट लेली पँट परिधान केलेला तसेच त्याच्या पायामधे खूप जुन्या व जीर्ण होत आलेल्या चपला होत्या  कूतहूला  पोटी  मी त्यांना जाताना विचारल ' हा मुलगा कोण.? '  त्यांनी मला सांगितल हा माझा मुलगा आहे.त्याला इंग्लीश मीडियम च्या शाळेत घातलय. गावाकड दुष्काळ पडल्यामुळे  8 महिन्यापूर्वी  पुण्यात आलो ऐथे  मी हमालाच काम करतो पैसा साठवून व थोडीफार गावाकडची जमीन विकून  पोराच इंग्लिश मीडियम  शाळेची फी भरली. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो.त्याची मुलाला शिकवण्याची तळमळ मी समजू शकतो.पण याला दोन वेळच्या जेवणाची पंचायत अन मुला...

जगण्याची उमेद

             गोपाळकाला झाला.अन  मी आमच्या गावच्या माणसासमवेत पंढरपूर हून चिखली कडे जाणाऱ्या बस मधे बसलो सर्वांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान दिसत होत ते म्हणजे वारी व विठ्ठलाच दर्शन यशस्वी झाल्याच. मला पुण्याला  जायच असल्यामुळे  मी सांगोल्या मधे बस ची रजा घेतली व पुण्याला जाणारी गाडी पकडण्यासाठी सांगोला बसस्थानका कड़े रवाना झालो जाता जाता पुण्याला जाणारी गाडी दिसली मी हात केला पण ती काही थांबली  नाही.थोडया वेळा साठी बस चुकली याच वाईट वाटत होत. आता परत एक तास बस ची वाट पहावी लागणार होती त्यामुळे मी सांगोल्याच्या बसस्थानकामधे  मधे बसलो. कॉलेज जवळच असल्याने स्टॅण्ड वरची हिरवळ न्याहळीत बसलो. तेवढ्यात स्पष्ट,कणखर व रांगडा असा आवज माझ्या कानावर पडला “चला फक्त दहा रूपयामधे ATM card ,PAN card,Addhar card ठेवण्यासाठी पाकीट फक्त दहा रुपये...' तो आवज इतका स्पष्ट व कणखर होता की आपुसकच माझ लक्ष्य त्याच्याकडे गेल. त्याला पहिल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला कारण ती एक अंध व्यक्ती होती.तरीदेखील चेहऱ्यावर प्रचंड अस तेज.चेहऱ्यावर व्यंग ...