Bargaining
काही दिवसांपुर्वीची गोष्ट रविवार असल्यामुळे थोडा उशीराचं उठलो. तशी पुण्यामध्ये बरीच लोक ही रविवारी उशीराच उठतात. पेपर आणण्यासाठी मी अकराच्या दरम्यान घराबाहेर पडलो.सकाळी 11 वाजता देखील उन्हाच्या झळा खूप मोठ्या प्रमाणावर जाणवत होत्या.रस्त्याच्याकडेला एक बाई बहूधा शेतकरी कुटूंबातीलचं असावी. भाजीपाला विकत बसली होती. रंगाने सावळी असलेली ती बाई आपल्या चिमुकल्या अशा लहान मुलीला सोबत घेऊन भर उन्हामधे डोक्यावरती टॉवेल घेऊन आणलेला भाजीपाला कधी खपतोय याची वाट पाहत असावी .ती लहानशी मुलगी आपल्या आईला काहीतरी खुणावत होती बहुधा ती आपल्याला भूक लागली आहे अशी सांगत असावी ती बाई मात्र तिच्या खुणेकडे कानाडोळा करत होती बहुधा तिला आपला माल विकून चार पैसे खिशात घेऊन घरी जाण्याची घाई झालेली असावी .मी तिथेच एक वर्तमानपत्र घेतल व उसाचा रस पिताना केलेल हे निरीक्षण तेवड्यात एक करड्या कलरची अशी मर्सिडीज गाडी आली व त्या बाईपाशी थांबली.त्या गाडीमधून जीन्स व टी- शर्ट परिधान केलेली बाई गाडीतून उतरली .तिच्या एकंदरीत वेशभूषेवरून ती खूप मोठया घरातील असावी .तीने मेथीची भाजी कितीला दिली ? असे त्या बाईला विचारले ती म्हणाली "10 रूपये जुडी घ्या म्याडम भाजी ताजी आहे सकाळीच शेतामधून आणली आहे .त्यावर ती म्याडम म्हणाली " 10 रुपयांना 2 जुड्या देत असशील तर बघ "त्यावर त्या बाईंचा चेहरा थोडा उतरला आणि म्हणाली "तुम्हाला 5 रुपयांना जुडी दिल्यानंतर मला त्यात किती रूपये मिळायचे 10 रुपयांना जुडी घ्या कमीच दर लावलाय. "त्यावर म्याडम म्हणाल्या "10 रुपयांना 2 जुड्या देत असशील तर बघ" त्या बाईने त्यास नकार दिला .तशा त्या म्याडमने दरवाजा उघडला व गाडीत बसली व ती आलिशान मर्सिडीज गाडी आपल्या दिशेने मार्गस्थ झाली .तशी ती भाजीपाला विकणारी बाई त्या आलिशान गाडीकडे हताश नजरेने पाहतच राहिली . हा सर्व प्रकार बघून मला मात्र त्या बाईच्या श्रीमंतीची किव आली. प्रश्न इथे संपत नाही तो इथून सुरू होतो. कारण भारतामध्ये श्रीमंतीत वाढलेली गरीब माणसे खूप आहेत. त्या बाईने 5 रूपयाकडे बघून व्यवहार मोडला. आता एरव्ही ती बाई 5 रूपयेऐवजी 30 रूपयाचे सिगरेट ओढून हवेच्या प्रदूषणामध्ये भरला घालेल. पण 5 रूपये एखाद्या गरजूला किंवा गरीबाला मिळू देणार नाही. धिक्कार असो असल्या संकूचित वृत्तीचा. माझा Bargaining ला अजिबात विरोध नाही पण Bargaining जिथे गरजेचे आहे तिथेचं करावं. एखाद्या गरीब व गरजू व्यक्तीबरोबर bargaining करूण आपल्याला काय मिळणार आहे. हल्ली माणसांना मी किती कमी रूपयांमध्ये वस्तू खरेदी केली याचा जास्त अभिमान वाटतो. पण आपल्यामूळे जर एखाद्या संसाराला हातभार लागत असेल व एखाद्या चेहर्यावर समाधान मिळत असेल तर काय अर्थ आहे असल्या bargaining चा. बऱ्याच वेळेला अनेक लोक मोठ-मोठ्या शॉपिंग मॉल, हॉटेल मधे गेल्यावर आहे त्या किंमतीला ती वस्तू ते खरेदी करतात .तेथे ते वस्तू कमी करून मागत नाहीत कारण तेथे त्यांना भीती वाटते व त्यांच धाडस होत नाही . त्यांच धाडस होत ते गरीब लोकांच्या समोरच आणि त्या ठिकाणी किंमत कमी करून मागितली तर समोरचा हसेल व आपल्या प्रतिष्ठेच काय ? हा पण प्रश्न उभा रहातोच . मला एवडेच सांगावस वाटत आपल्या अवतीभोवती अनेक माणसे असतात जी जगण्यासाठी व आपल्या कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी धडपडत असतात .त्यांच्या सोबत bargaining करताना विचारपूर्वक च केल पाहिजे . कस आहे माणसाच राहणीमान , कपडे ब्रँडेड असण्यापेक्षा त्याच मन ब्रँडेड असणं खूप महत्वाच आहे . - प्रवीण कुंभार kumbharpravin10@gmail.com
Yes , it's fact...
ReplyDeleteThanks
DeleteKharch khar ahe raw
DeleteNice pravin ...👌👌👌
ReplyDeletenice mitra...
ReplyDeleteThanks
DeleteThanks
ReplyDeleteChan
ReplyDeleteThanks
DeleteChan
ReplyDeleteSuch a realistic & heart-touching writing bro.we have proud on your social thinking .
ReplyDeleteKeep it up..
This comment has been removed by the author.
ReplyDelete