करड (एक ग्रामीण कथा )
@ एक सत्य घटनेवर आधारित ग्रामीण कथा @ माय न तोंडावर गरम पाण्याचे शिंतोड मारल तसा गण्या चटकन जागा झाला दिवस कधीचा उगवला होता. माय न रोजच टिम टिम गाण चालू केल " गण्या उठ लवकर, मगापासन शेरड ओरडाय लागल्याती आणि तू डाराडूर झोपी गेलाय उठ लवकर." आईच्या आवाजान गण्या चटकन उठून बसला. गण्यान सगळ आटोपून तोंड धूतल व न्याहारीसाठी आतल्या सोप्यात जावून बसला. माय न ताटात शिळी भाकरी अन खरडा वाढला तोच शेणकुटाच्या धुरान गण्याच्या डोळ्यात पाणी आल तसं गण्या ताट घेऊन तराट बाहेर आला अनं कटट्यावर बसला. त्याची नजर दोनच दिवसा पूर्वी उपजलेल्या करडावरती पडली. एक काळ्या रंगाचं व दुसरं पांढऱ्या रंगाचं दिसायला खुप छान दिसायची अस वाटायच त्यांना कवेत घेतल की परत सोडूच नये. गण्याची न्याहरी आटोपली व तो शेरडांची दुरी सोडू लागला. त्याने शेरडांना सोडलं तसं ही बारकी करडं आईच्या पाठोपाठ अडव्या - तिडव्या उड्या मारत जावू लागली.
त्या दोन करडांना बघितलं की गण्या जाम खुष व्हायचा. नुकताच पावसाळा सुरू झाला होता. त्यामुळे सर्वत्र
हिरवल पसरली होती. तसेच झाडा - झुडपांना नवीन पालवी फुटत होती. गण्या नेहमी जंगलाच्या कडेला असलेल्या डोंगरात शेरड चरवायला न्यायचा. त्याचा हा रोजचाच दीनक्रम होता. अनं शाळेला जायच्या वेळेत तो शेरडांना परत घरी घेऊन येत असे. करडं खुप बारकी असल्यामुळे गण्या त्यांना झाडांची व झुडपांची कोवळी पाने खावू घालायचा व ती करडं देखील पाला खुप आवडीने खायची. जरा कुठं डोंगराचा चढ लागला तर करड धापा टाकायची. तसं गण्या शेरडांना पूढे ढकलायचा व त्यांना आपल्या दोन्ही काखेत घेऊन डोंगर पार करायचा व ती करडं निवांतपणे त्याच्या काखेत विसावा घ्यायची. सकाळपारी शेळ्यांना चरवायला घेवून जाण व नंतर शेळ्यांची पोट भरली की त्यांना घराकडं आणणं व त्याच्यानंतर जेवण करून घरापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या मराठी शाळेत जाणं हा त्याचा दिनक्रम ठरलेला असायचा. तो शाळेतुन घरी आला की ही दोन करड आपोआप त्याच्या जवळ जायची.त्याच्या अंगावरती खेळायची . कधी त्याला ही करड ढुशा (ट्टक्कर ) मारायची . त्याच्या मधे व करडा मधे मायेच व आपुलकीच एक नात तयार झाल होत .गण्या जरी शाळेत गेलेला असला तरी त्याच सार लक्ष करडाकडेच असायचं .त्यामुळे त्याच शाळेत काय लक्ष लागायच नाही . बघता बघता पावसाळ्यातील हिरव्या चाऱ्यामुळे करड व शेळ्या अंगाण भरगच्च भरली करड पण आता शेळीच्या बरोबरीने दिसत होती .मोठी झालेली करड ही त्यांच्या आई पेक्षा गण्याजवळ जास्त असायची . गण्याने शेरडांना चरायला सोडलं की ही दोन पालवी (आता मोठी) शेळीच्या मागून न जाता गण्याच्या मागून जायची व त्यांनादेखील माहीत होत की आपला मालक कुठे कोणत्या झाडाचा पाला खावू घालणार आहे. कधी खधी गण्या या करडांसोबत झोपी जायचा. गण्यान मात्र या करडांवरती खूप जीव लावला होता व त्यांनीदेखील.
असेच दिवसामागून दिवस सरत होते. करडं आता आकाराने शेळीपेक्षाही मोठी झाली होती. अंगापिंडाने भरगच्च झाली होती. टोकदार अशी शिंगे फुटली होती. एके दिवशी गण्या शाळा संपवून घरी परतत होता. तेवढ्यात त्याला शिरपा खाटीकची गाडी त्याच्या घरासमोर असल्याची दिसली. ते बघताच गण्याचं पाच बोललं. तसा गण्या घाबरला व डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. गण्या डोळं पुसतं घरात शिरला व घरात जावून म्हणला ,"आमची करडं द्यायची नाहीत खाटक्याला ". तसा गण्याचा बापूस म्हणाला, " आला लई मोठा शहाणा द्यायची नाहीत म्हणं अनं सावकाराचं कर्ज कोन फेडायचं लेका त्यानं सारखा तगादा लावलायं." तसा शिरपा खाटिक उठला व करडांकडे निघाला तसा गण्या पळत पळत गेला व त्या दोन पालव्यांना मिठीत घेऊन रडू लागला. तशी ती पालवी (करड) देखील जोर जोरात ओरडू लागली. शिरपा खाटीकने दोरी सोडण्यासाठी हात पुढे केला तसा गण्यानं कडकडून त्याच्या हाताचा चावा घेतला. तसा शिरपा खाटीक पिसाळला. व गण्याला त्या शेरडापासून दूर करू लागला. तेवढ्यात बापूस व माय न गण्याला पकडलं. तो त्यांच्या तावडीतून सुटण्याचा अटोकाट प्रयत्न करत होता. ओरडत होता किंचाळत होता. बाबा पालव्यांना विकू नका अशी केविलवाणी विनंती करत होता. शिरपा खाटीकने दोन्ही पालव्यांची दोरी सोडली पण ती पालवी गण्याच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करत होती. ती काही केल्यास शिरपाच्या दिशेनं जात नव्हती. शिरपा जोराने पालव्यांना ओढण्याचा प्रयत्न करत होता. पण ती जोरात ओरडत होती. कदाचित ती सांगत असावीत आमच्या मालकापासून आम्हाला दूर लोटू नका आणि हा सारा तमाशा पूर्ण गाव पाहत होता. तसा शिरपाचा आणखी एक साथीदार आला व ते दोन्ही पालव्यांना ओढू लागले. पण ती पालवी मात्र गण्याकडे पाहून ओरडत होती.हे पाहून गण्याला आणखीनच रडू आल . ज्या पिलांना तळहाताच्या फोड़ा प्रमाणे जपल आज त्यांना आपण खाटीक च्या स्वाधीन केल .याच त्याला खूप वाईट वाटत होत .अखेर शिरपा खाटीक त्या पिलांना घेऊन गेला .इकडं गण्याच्या माय न चहा टाकला व बापूस कट्यावर बसून पैसे मोजु लागला . चहाला उसळी आल्यावर माय न गण्याला चहा पिण्यासाठी हाक मारली . पण काहीच प्रतिसाद आला नाही .तशी गण्याची माय उठली व इकडे तिकडे शोधू लागली . तिच्या पाठोपाठ गण्याचा बाप देखील शोधू लागला .गण्या कुठेच सापडत नाही म्हटल्यावर गण्याच्या मायचा धीर सुटला .व ती रडू लागली . बघता बघता ही गावभर झाली . इकडे सगळी भावकी जमा झाली . व गाण्याचा सर्वत्र शोध घेऊ लागली . गण्याची माय मात्र माज्या पोराला परत घेऊन या म्हणून विनवन्या करू लागली सर्वत्र शोधा शोध सुरू झाली पण गण्या काय सापडत न्हवता .तस वाईट वंगाळ विचार सर्वांच्या मनात येऊ लागल. पोरांन काही बर वाईट करून घेतलं नसल न्हव. या विचारण गण्याचा बाप पण रडू लागला .तसा लोकांनी त्याला धीर दिला . तशी सगळीकडे गण्याची शोधा शोध सुरू होतीच . पण त्याचा काही ठाव ठिकाना लागत न्हवता . बऱ्याच वेळा नंतर गण्याचा बापूस जनावरांना वाळलेली गवताची पेंडि काढन्यासाठी माळ्यावर चढला . तसा त्याला धक्काच बसला . गण्या वाळलेल्या गवतामधे शांत पणे झोपला होता .पण त्याचे डोळे मात्र रडून रडून खूप सुजले होते . चेहरा लालबुंद झाला होता .कदाचित स्वप्नांमधे तो त्या दोन करडासोबत खेळत असावा .गण्याचा बापूस ओरडला " गण्या सापडला " तशी गण्याच्या मायन माळीकडे धाव घेतली .
- प्रवीण कुंभार .

Nice bro Chan lihala ahes
ReplyDeleteThanks
DeleteChan pravin
ReplyDeleteThanks
DeleteMstch pravin
ReplyDeleteThanks
Delete