जगण्याची उमेद
गोपाळकाला झाला.अन मी आमच्या गावच्या माणसासमवेत पंढरपूर हून चिखली कडे जाणाऱ्या बस मधे बसलो सर्वांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान दिसत होत ते म्हणजे वारी व विठ्ठलाच दर्शन यशस्वी झाल्याच. मला पुण्याला जायच असल्यामुळे मी सांगोल्या मधे बस ची रजा घेतली व पुण्याला जाणारी गाडी पकडण्यासाठी सांगोला बसस्थानका कड़े रवाना झालो जाता जाता पुण्याला जाणारी गाडी दिसली मी हात केला पण ती काही थांबली नाही.थोडया वेळा साठी बस चुकली याच वाईट वाटत होत. आता परत एक तास बस ची वाट पहावी लागणार होती त्यामुळे मी सांगोल्याच्या बसस्थानकामधे मधे बसलो. कॉलेज जवळच असल्याने स्टॅण्ड वरची हिरवळ न्याहळीत बसलो. तेवढ्यात स्पष्ट,कणखर व रांगडा असा आवज माझ्या कानावर पडला “चला फक्त दहा रूपयामधे ATM card ,PAN card,Addhar card ठेवण्यासाठी पाकीट फक्त दहा रुपये...' तो आवज इतका स्पष्ट व कणखर होता की आपुसकच माझ लक्ष्य त्याच्याकडे गेल. त्याला पहिल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला कारण ती एक अंध व्यक्ती होती.तरीदेखील चेहऱ्यावर प्रचंड अस तेज.चेहऱ्यावर व्यंग असल्याचा कुठे लवलेश ही न्हवता की आवाजा मधे कुठे व्याकूळता न्हवती.होता तो म्हणजे प्रचंड असा आत्मविश्वास आणी स्वाभिमान. त्याला वाटल नाही की मी विकलांग आहे.कोणाकडे तरी हात पसरवा.त्याला मदत मिळाली असती पण त्यान तस केल नाही.ताठ मानेने व स्वाभिमाना ने तो पुस्तके व पाकीट विकत होता. खरच त्याच्या या स्वाभिमानी व्रुती ला सलाम !
त्यावेळी मी स्टॅण्ड वरती अनेक मानस पाहत होतो. कोणाच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते. कोणी नाराज दिसत होता. ज्याना हात,पाय,कान,डोळे यासारखे अवयव असून देखील बरीच मानस दुःखी वाटत होती पण ज्या माणसाने स्वतः च काय तर दुसऱ्याच हास्य देखील पाहिल नाही अशी अंध व्यक्ति हसत हसत पुस्तके व पाकीट विकत होती.किती मोठा हा विरोधाभास. आणि आपण मात्र देवाकडे नेहमी तक्रार करायची की देवाने मला हे दिल नाही देवाने मला ते दिल नाही. मला तर वाटत देवाने मला काळ-गोर, गरीब -श्रीमंत, जाड -सड़ पातळ असल्या तक्रारी करण्यापेक्षा देवाने जस दिलंय तस आपण स्वीकारल पाहिजे. ज्या प्रमाणे त्या अंध माणसाने स्वीकारले तस. त्यामुळे मित्रहो इथून पुढे कोणतेही तक्रार करण्या पेक्षा त्याने जे दिलंय ते स्वीकारा बघा जीवन किती सुंदर होत.असो
काही माणसे पाकीट व पुस्तके घेऊ लागली मी ही त्याच्या जवळ गेलो. त्याला पैसे दिले व पाकीट घेतल. तशी पाहता मला त्या पाकिटा ची काही गरज न्हवती.पण ते घेतल्यावर त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड अस समाधान मला दिसत होत.परिस्थिती समोर हतबल न होता.हार न मानता जिद्दी ने व स्वाभिमानाने जगणाऱ्या अंध माणसाला सलाम केला व प्रचंड अशी सकारात्मक ऊर्जा घेऊन पुण्याच्या दिशेनं निघालो.पण या प्रवासांत मात्र मनामधे विचारांच वादळ सुरू झाल.
मित्रहो मला एवढच सांगायच आहे की कुठे ही तुम्हाला अंध व विकलांग व्यक्ती अशा वस्तु विकताना दिसल्या तर त्या जरूर घ्या कारण त्या भीक न मागता स्वाभीमानाने व ताठ माने ने समाजामधे जगण्याच्या व्रुत्ति ला सलाम म्हणून.
मोठ मोठ्या मॉल मधे कोणीही लाखो रुपयांची खरेदी करू शकत पण व्यंग असलेल्या व्यक्तीकडून 10 किंवा 20 रुपयांची खरेदी करायला खूप मोठ मन असाव लागत.
मला तर वाटत दगडांमधे देव शोधण्यापेक्षा अशा माणसांच्या चेहऱ्यावर आपल्या मुळे काही काळा साठी समाधान लाभत असेल तर देव देखील तुम्हाला नक्कीच स्वर्गात जागा देतील.
तुम्हाला काय वाटत ?.......
प्रवीण कुंभार
9960075883

Nice bro
ReplyDeleteNice story.... 👌🏻
ReplyDeleteIt's reality not story
DeleteNice
ReplyDeletethanks
DeleteNice
ReplyDeletethanks
ReplyDelete