Posts

Showing posts from 2019

Pub-G एक व्यसन .

          आज सुट्टीचा  दिवस त्यामुळे आज जरा निवांतच उठलो. मला कामानिमित्त स्वारगेटला जायचं असल्यामुळे मी राहत असलेल्या ठिकाणपासुन जवळच असलेल्या PMT बसस्थानकाकडे मार्गस्थ  झालो.उन्हाचा तडाखा जरा जास्तच जाणवत होता. त्यामुळे सावलीत उभे राहण्यासाठी मी स्थानकात गेलो. त्या ठिकाणी मला वेगळंच चित्र पहायला मिळाल .दुपारच्या वेळेला त्या बसस्थानकामध्ये बसण्यासाठी थोडी सुद्धा जागा नव्हती. लहान मुला पासुन ते लग्नाला आलेल्या पोरापर्यंत  सर्वजण  मोबाईल हातात घेऊन बसले होते. प्रथम दर्शनी  मला वाटलं हे कोणत्या तरी बसची वाट पाहत असावेत. पण नंतर माझ्या लक्ष्यात आलं की हे कोणतीतरी game खेळत आहेत. त्या टोळक्यामधे  मी थोडीशी बसण्यापूरती जागा मिळवली. थोडीशी सावली मिळाल्यामुळे जरा बरं वाटलं. मी शेजारीच बसलेल्या एका लहान मुलाला विचारलं तू काय खेळतो आहेस त्यावर तो म्हणाला  'Pub - G' मला या गेमविषयी ऐकून माहीत होत. पण प्रत्यक्षात कधी ती गेम पाहिली नव्हती. ती मुलं Pub - G खेळण्यामध्ये इतके गुंग झालेले दिसत होते की समोर कोण आलं ?  समोरून कोणती गाडी...

इंग्लिश मीडियम एक Fashion .

            2 महिन्यापुर्वीची गोष्ट  पुण्यामधे  रेल्वे स्टेशनवरून हडपसर कडे जाण्यासाठी निघालो तिथे एका लहान मुलाने व त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्ति ने माझे लक्ष वेधून घेतले. मुलाने आकर्षक असा शाळेचा गणवेष परिधान केला होता , पायामधे काळ्या रंगाचे सुंदर असे बूट होते दिसायला तो 4-5वर्षाचा चिमुकला छान वाटत होता पण त्याच्या सोबत असणारी व्यक्ती मात्र विचित्र  वाटत होती. फाटका  व मळकटलेला शर्ट  व मळकट लेली पँट परिधान केलेला तसेच त्याच्या पायामधे खूप जुन्या व जीर्ण होत आलेल्या चपला होत्या  कूतहूला  पोटी  मी त्यांना जाताना विचारल ' हा मुलगा कोण.? '  त्यांनी मला सांगितल हा माझा मुलगा आहे.त्याला इंग्लीश मीडियम च्या शाळेत घातलय. गावाकड दुष्काळ पडल्यामुळे  8 महिन्यापूर्वी  पुण्यात आलो ऐथे  मी हमालाच काम करतो पैसा साठवून व थोडीफार गावाकडची जमीन विकून  पोराच इंग्लिश मीडियम  शाळेची फी भरली. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो.त्याची मुलाला शिकवण्याची तळमळ मी समजू शकतो.पण याला दोन वेळच्या जेवणाची पंचायत अन मुला...

जगण्याची उमेद

             गोपाळकाला झाला.अन  मी आमच्या गावच्या माणसासमवेत पंढरपूर हून चिखली कडे जाणाऱ्या बस मधे बसलो सर्वांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान दिसत होत ते म्हणजे वारी व विठ्ठलाच दर्शन यशस्वी झाल्याच. मला पुण्याला  जायच असल्यामुळे  मी सांगोल्या मधे बस ची रजा घेतली व पुण्याला जाणारी गाडी पकडण्यासाठी सांगोला बसस्थानका कड़े रवाना झालो जाता जाता पुण्याला जाणारी गाडी दिसली मी हात केला पण ती काही थांबली  नाही.थोडया वेळा साठी बस चुकली याच वाईट वाटत होत. आता परत एक तास बस ची वाट पहावी लागणार होती त्यामुळे मी सांगोल्याच्या बसस्थानकामधे  मधे बसलो. कॉलेज जवळच असल्याने स्टॅण्ड वरची हिरवळ न्याहळीत बसलो. तेवढ्यात स्पष्ट,कणखर व रांगडा असा आवज माझ्या कानावर पडला “चला फक्त दहा रूपयामधे ATM card ,PAN card,Addhar card ठेवण्यासाठी पाकीट फक्त दहा रुपये...' तो आवज इतका स्पष्ट व कणखर होता की आपुसकच माझ लक्ष्य त्याच्याकडे गेल. त्याला पहिल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला कारण ती एक अंध व्यक्ती होती.तरीदेखील चेहऱ्यावर प्रचंड अस तेज.चेहऱ्यावर व्यंग ...

पिंजऱ्यातील तळमळ

           तीन  वर्षापूर्वीची गोष्ट  रविवारी बडोद्यामधील सयाजी बागेत जाण्याचा  योग आला. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या काळामध्ये  बांधलेली ही बाग  बागेच्या प्रवेशद्वारा समोरील चौकात त्यांचा भव्य असा पुतळा आहे. जणू काही ते सर्व जनतेवर प्रजहितदक्ष  राजा प्रमाणे आज ही आपल्या जनतेवरती  नजर ठेवत आहेत असा भास होतो .             बागेची  बांधणी व  सजावट आकर्षक अशी आहे. बागेतील  थोडी हिरवळ पाहिल्यानंतर  आम्ही पक्षी उद्यान पाहण्यासाठी  तिकिट काढले व आम्ही त्या उद्यानामध्ये प्रवेश केला अत्यंत आकर्षक असे पक्षी पाहून मनाला खूप बरे वाटले.  या उद्यानामध्ये पोपटा च्या इतक्या वेग - वेगळया जाती  मी पहिल्यांदाच पाहत होतो  आमच्या सोबत बरेच पर्यटक या पक्षी दर्शनाचा लाभ घेत होते. असेच मी पक्षी बघत पुढे जात होतो आणी मी एका पिंजरा जवळ थांबलो  पिंजर्यात आपल्या कड़े जे मोठे गावठी कोंबडे असतात तेवढ्या  आकाराचा विविध रंगांनी सजलेला आकर्षक असा पोपट होता सर्व ...