Bargaining
काही दिवसांपुर्वीची गोष्ट रविवार असल्यामुळे थोडा उशीराचं उठलो. तशी पुण्यामध्ये बरीच लोक ही रविवारी उशीराच उठतात. पेपर आणण्यासाठी मी अकराच्या दरम्यान घराबाहेर पडलो.सकाळी 11 वाजता देखील उन्हाच्या झळा खूप मोठ्या प्रमाणावर जाणवत होत्या.रस्त्याच्याकडेला एक बाई बहूधा शेतकरी कुटूंबातीलचं असावी. भाजीपाला विकत बसली होती. रंगाने सावळी असलेली ती बाई आपल्या चिमुकल्या अशा लहान मुलीला सोबत घेऊन भर उन्हामधे डोक्यावरती टॉवेल घेऊन आणलेला भाजीपाला कधी खपतोय याची वाट पाहत असावी .ती लहानशी मुलगी आपल्या आईला काहीतरी खुणावत होती बहुधा ती आपल्याला भूक लागली आहे अशी सांगत असावी ती बाई मात्र तिच्या खुणेकडे कानाडोळा करत होती बहुधा तिला आपला माल विकून चार पैसे खिशात घेऊन घरी जाण्याची घाई झालेली असावी .मी तिथेच एक वर्तमानपत्र घेतल व उसाचा रस पिताना केलेल हे निरीक्षण तेवड्यात एक करड्या कलरची अशी मर्सिडीज गाडी आली व त्या बाईपाशी थांबली.त्या गाडीमधून जीन्स व टी- शर्ट परिधान केलेली बाई गाडीतून उतरली .तिच्या एकंदरीत वेशभूषेवरून ती खूप मोठया घरातील...