Pub-G एक व्यसन .
आज सुट्टीचा दिवस त्यामुळे आज जरा निवांतच उठलो. मला कामानिमित्त स्वारगेटला जायचं असल्यामुळे मी राहत असलेल्या ठिकाणपासुन जवळच असलेल्या PMT बसस्थानकाकडे मार्गस्थ झालो.उन्हाचा तडाखा जरा जास्तच जाणवत होता. त्यामुळे सावलीत उभे राहण्यासाठी मी स्थानकात गेलो. त्या ठिकाणी मला वेगळंच चित्र पहायला मिळाल .दुपारच्या वेळेला त्या बसस्थानकामध्ये बसण्यासाठी थोडी सुद्धा जागा नव्हती. लहान मुला पासुन ते लग्नाला आलेल्या पोरापर्यंत सर्वजण मोबाईल हातात घेऊन बसले होते. प्रथम दर्शनी मला वाटलं हे कोणत्या तरी बसची वाट पाहत असावेत. पण नंतर माझ्या लक्ष्यात आलं की हे कोणतीतरी game खेळत आहेत. त्या टोळक्यामधे मी थोडीशी बसण्यापूरती जागा मिळवली. थोडीशी सावली मिळाल्यामुळे जरा बरं वाटलं. मी शेजारीच बसलेल्या एका लहान मुलाला विचारलं तू काय खेळतो आहेस त्यावर तो म्हणाला 'Pub - G' मला या गेमविषयी ऐकून माहीत होत. पण प्रत्यक्षात कधी ती गेम पाहिली नव्हती.
ती मुलं Pub - G खेळण्यामध्ये इतके गुंग झालेले दिसत होते की समोर कोण आलं ? समोरून कोणती गाडी गेली?
आपल्या शेजारी कोणं बसलं आहे ? याचं त्या मुलांना जरा सुद्धा भानं राहीलं न्हवत . त्यांनी त्या Pub - G गेममध्ये आपलं सार भावविश्व सामावून घेतलं होतं. त्यांच फक्त एकच ध्येय होत जास्तीत जास्त point मिळवणे व या गेममध्ये आपलं स्वतःच वर्चस्व प्रस्थापित करणे. मला हे द्रुश्य पाहून मात्र खूप वाईट वाटलं. हा देश तरूणांचा देश म्हणून गणला जातो आणि या देशातील तरूण हा काहीही कामधंदा न करता Pub-G च्या आहारी गेला आहे. त्यांना आपल्या जबाबदारीची कोणतीही जाणीव राहिली नाही. त्याहून मला वाईट वाटलं अगदी 4 थी 5 वीची मुलं सुद्धा त्या मुलांच्या शेजारी बसून ती गेम पाहतं होते व काही लहान मुले ती गेम खेळत देखील होते. कारण लहाण मुलं ही मोठ्यांच अनुकरण करतात. आता त्या लहाण मुलांनी त्या मोठ्या मुलांकडून काय आदर्श घ्यावा. त्यांच्यामध्ये पण या Pub - g चं व्यसन आपसुकच रुजलं असेल यात शंकाच नाही.काही वेळ तेथे बसल्यावर 10 ते 12 वर्षाच्या मुलाला त्याच्या आईचा फोन आला. पण त्याने अत्यंत रागाच्या भरामध्ये तो call घेतला नाही. परत तो Pub - g च्या विश्वामध्ये रममाण झाला. काही वेळानंतर परत त्याच्या आईचा call आला. यावेळी मात्र त्याचा राग अनावर झाला व त्याने फोन उचलला व रागाच्या भरात तिच्यासोबत बोलू लागला. "आई तुला कळतयं की नाही,तुला किती वेळेला सांगितलं मला फोन करत जावू नको म्हणून मी जेवायला येणार नाही तू आता फोन ठेव". तो त्याच्या आईशी रागाच्या भरामध्ये व तीचा तिरस्कार केल्यासारखा बोलत होता. तेवढ्यात बस आली व मी स्टेशनकडे जाण्यासाठी बसमध्ये चढलो . खिडकीतून बाहेर डोकावताना मात्र माझ्या मनामध्ये विचारांच वादळ सुरू झालं. दहा वर्षाच्या त्या मुलाने आईचा इतका द्वेष का करावा . याच मात्र मला खूप वाईट वाटत होत. आपल्या जन्मदात्या आईविषयी इतकी तिरस्काराची भावना निर्माण होण्यासाठी तो मोबाईल व तो खेळत असलेला Pub - g ती गेमचं कारणीभूत आहे का? तर याच उत्तर नाहीच असं येईल . तर या गोष्टीसाठी आपला समाज व त्या मुलाचे आई-वडीलही तितकेच जबाबदार आहेत. आज आपल्या समाजामध्ये अशी अनेक मुल आहेत ती या pub - g गेमच्या आहारी गेली आहेत व त्या गेममुळे ते हिंसक बनत आहेत. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रामधे देखील यासंदर्भात बातम्या आल्या होत्या.यामध्ये तर एका मुलाला P ub -G आहारी गेला व मानसिक संतुलन बिघडल्यामुळे दवाखान्यामध्ये दाखल करावं लागलं होतं. दूसरी बातमी अशी होती एक मुलगा दिवस-रात्र या गेममुळे वेड्यासारखं फिरतं असे.
या देशाची तरूणाई जर अशा गेमच्या व्यसनामुळे अशी भरकट गेली तर आपल्या देशाचे भवितव्य अंधारमय असेल यात शंकाच नाही .पालक व सूज्ञ तरूणांनी वेळीच सावध झाले पाहीजे. पालकांनीदेखील लहान वयामध्ये आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवल पाहिजे व त्यांना अशा पद्धतीच्या गेमपासून सावधान केलं पाहीजे. आज समाजामध्ये असे अनेक तरूण आहेत जे जबाबदारी उचलायची सोडून Pub -g सारखे गेम खेळून आपला अमुल्य असा वेळ वाया घालवत आहेत.
या विषयी नक्कीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पालकांनी देखील आपल्या मुलांवरती अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. अशा गेमचे व्यसन लागू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. आजच्या युगामध्ये मोबाईल हे दुधारी तलवार असल्यासारखं आहे. त्याचा कसा वापर करावा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. मोबाईल या तंत्रज्ञानाचा उपयोग जर ज्ञान ग्रहन करण्यासाठी व समाजापूढे असलेल्या समस्येच्या निराकरणासाठी केल तर नक्कीच अब्दुल कलाम व स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील भारत घडायला वेळ लागणार नाही.🙏🙏🙏 - प्रवीण कुंभार
Nice and important message to all...
ReplyDeleteसरकार Kadun पब-जी गेम वर बंदी अनला पाहिजे
ReplyDeleteहोय सरकारने ही यामधे हस्तक्षेप केला पाहिजे .
Deleteखरच प्रवीण ही सध्याची सत्य परिस्तिथी आहे ....need to take it seriously...
ReplyDeleteधन्यवाद अशी परिस्थिती समाजासाठी खूप घातक आहे
Deletenice pravin
ReplyDeleteThanks
DeleteKhupach mst vichar mandale
ReplyDeleteThanks Sir
ReplyDeleteNice message pravin
ReplyDeleteThanks
DeleteAppreciable
ReplyDeleteNice Pravin..
ReplyDeleteNice pravin
ReplyDeleteNice dada
ReplyDeleteThanks
DeleteReality written by you bro...
ReplyDeleteIn nowadays must have to think on that otherwise we will be thown far away from our 'SANSKRITY' and far back from world in the era of technology.
Thanks and its very danger situation for our Country
ReplyDeleteTrue story...
ReplyDeleteTechnology ही खूप सुंदर गोष्ट आहे पण ती जेंव्हा चुकीच्या हातात पडते तेंव्हा त्याचे दिसून येणारे नकारात्मक परिणाम; याचं भीषण वास्तव. थोडक्यात माकडांच्या हातात कोलीत.
ReplyDeleteYou are right
ReplyDelete